व्यापाऱ्याची वैजापुरात गळफास घेऊन आत्महत्या

Foto
सात जणांविरुद्ध गुन्हा; पैशाच्या कारणावरून छळ केल्याचा व्हिडिओत आरोप

वैजापूर, (प्रतिनिधी) : शहरातील गोल्डननगर वेधील व्यापारी शेख करीम शेख (वय ४५) याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२०) सकाळी सात वाजेला उघडकीस आली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सात जणांविरुद्ध मयत जापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रण्यात आला आहे.

मयत शेख करीम हे बटाटा व्यापारी म्हणून परिचित होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करून समाज माध्यमावर व्हायरल केला. अन्नू आझाम शेख (रा. गोल्डन शेख करीम (रा. गंगापूर), विलास शेटे नगर), वसीम बाबू बागवान (रा. श्रीरामपूर), घायवट बाई (फुलेवाडी रोड, वैजापूर), विनोद राजपूत (परदेशी) नाना गल्ली वैजापूर), मुकेश राजपूत (महाराणा प्रताप रोड, वैजापूर), विक्रम राजपूत (महाराणा प्रताप रोड, वैजापूर) अशी या प्रकरणातील सात आरोपींची नावे आहेत.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, सात आरोपीनी पैशाच्या कारणावरून आपणास करत असल्याचे व्यापारी शेख करीम यांनी त्रास दिला, यास कंटाळून आत्महत्या व्हिडीओत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाडळे करीत आहेत.